शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) (Elementary & Intermediate grade exam) परीक्षा 2022 चे आयोजन ऑफलाईन पध्दतीने 28 सप्टेंबर, 2022 ते 1 ऑक्टोबर, 2022 या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र राज्य कलासंचालनालयाच्या वतीने सप्टेंबर 2022 मध्ये होणाऱ्या शासकीय रेखाकला ग्रेड चित्रकला एलिमेंटरी व इंटरमेजिएट परीक्षांचे केंद्र नोंदणी, विद्यार्थी नोंदणी, वेळापत्रक असलेले परिपत्रक नुकतेच महाराष्ट्र राज्य कलासंचालनालयाचे प्रभारी कलासंचालक विश्वनाथ साबळे यांनी राज्यातील सर्व शाळाना पाठवून जाहीर करण्यात आले आहे.
या शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा 2022 चे आयोजन ऑफलाईन पध्दतीने 28 सप्टेंबर, 2022 ते 1 ऑक्टोबर, 2022 या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे. शासकीय रेखाकला परीक्षा केंद्रांची नोंदणी, विद्यार्थ्यांची नोंदणी व परीक्षा फी
ऑनलाईन पध्दतीने
www.doa.maharashtra.gov.in/https://dge.doamh.inया संकेतस्थळावर भरावयची आहे.
परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक(elementary & intermediate exam date and time table) तसेच ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणाऱ्या नोंदणीचा तक्ता खालील प्रमाणे.
शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा 2022 एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षा वेळापत्रक
बुधवार, 28 सप्टेंबर, 2022, पेपर 1ला- वस्तुचित्र : स. 10.30 ते दु. 1, पेपर 2 रा- स्मरणचित्र : दु. 2 ते 4
गुरुवार, 29 सप्टेंबर, 2022 : पेपर 3 रा- संकल्पचित्र : स. 10.3 ते दु. 01, पेपर 4 था- कर्तव्यभूमिती व अक्षरलेखन : दु. 2 ते 4.
इंटरमेजिएट ड्रॉईंग परीक्षा वेळापत्रक (intermediate drawing exam date and time table)
शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022, पेपर 1ला- स्थिरचित्र : स. 10.30 ते 1, पेपर 2 रा- स्मरणचित्र : दु. 2 ते 4,
शनिवार, 1 ऑक्टोबर 2022, पेपर 3 रा- संकल्पचित्र : स. 10.30 ते 1.30, पेपर 4 था - कर्तव्य भूमिती, घनभूमिती व अक्षरलेखन : दु. 2. 30 ते 5. 30
शासकीय रेखाकला परीक्षा केंद्रांची नोंदणी/ केंद्राची माहिती अद्यावत करणे ऑनलाईन पध्दतीने - 1 ते 5 ऑगस्ट 2022 पर्यंत
एलिमेंटरी व इंटरमिजिएट या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनी 1 ते 30 ऑगस्ट 2022 नाव नोंदणी ऑनलाईन पध्दतीने करायची आहे.
एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा ऑनलाईन पध्दतीने फी पेमेंट गेटवे द्वारे ता. 25 ते 30 ऑगस्ट 22
परीक्षक, समालोचक व उपमुख्य समालोचक नोंदणी ऑनलाईन पध्दतीने ता. 1 ते 30 ऑगस्ट 2022
एलिमेंटरी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी 80 रुपये तर इंटरमेजिएटच्या विद्यार्थ्यांना 130 रुपये फी आणि ऑनलाईन पध्दतीने करावयाची नोंदणी व
संबंधित माहिती www.doa.maharashtra.gov.in https://dge.doamh.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहील अशी माहिती कलासंचालनालयाकडून देण्यात आली आहे.
0 टिप्पण्या
This website is providing you latest updates for your kind knowledge, so you can also visit the official website for detailed information,