पुणे(Pune) - शैक्षणिक वर्ष २०२२-२३च्या इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (नॉन क्रिमीलेअर-एनसीएल) काही तांत्रिक बाबींमुळे विद्यार्थी सादर करू न शकल्यास अशा विद्यार्थ्यांकडून हमीपत्र भरून घेण्यात यावे. तसेच विद्यार्थ्यांना एनसीएल प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात यावी, असे शालेय शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी विवेक सपकाळ यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अद्याप एनसीएल प्रमाणपत्र(NCL certificate) मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांचा अकरावी प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.
या प्रवेशासाठी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (एनसीएल) NCL उपलब्ध असल्यास विद्यार्थी ही प्रमाणपत्रे अपलोड करू शकतील. परंतु, अर्ज भरतेवेळी हे प्रमाणपत्र(NCL certificate) अपलोड(Upload) करणे बंधनकारक करण्यात येऊ नये, विद्यार्थ्यांकडून हमीपत्र घेऊन त्यांना हे प्रमाणपत्र(certificate) सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी द्यावा, असे सपकाळ यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. याबाबत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी परिपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
- दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला, परंतु मंडळाकडून गुणपत्रके प्राप्त नसलेल्या विद्यार्थ्यांनी काय करावे?
- निकाल विलंबाने जाहीर झाला, अशा विद्यार्थ्यांना त्या-त्या वेळी प्रवेश प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर ऑनलाइन अर्ज (online application) भरून केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल. मूळ गुणपत्रक(original markmemo) मिळण्यास विलंब होणार असल्यास संबंधित परीक्षा मंडळाकडून ऑनलाइन प्राप्त झालेली गुणपत्रके ग्राह्य समजण्यात येतील. त्यासाठी अशा विद्यार्थ्यांनी गुणांचा तपशील 'डिजीलॉकर(digi locker) वर उपलब्ध असल्यास त्याची प्रत घेऊन अपलोड करावी. मंडळाच्या पोर्टलवरून मिळणारी प्रत आपल्या माध्यमिक शाळेकडून प्रमाणित करून घ्यावी आणि अपलोड(upload) करावी.
- एटीकेटी(ATKT) पात्र विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया(Admission PROCESS) कशी असेल?
- दहावीमध्ये एटीकेटीची सवलत मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी विशेष फेरीनंतर(Special Round) स्वतंत्र फेरीचे आयोजन करण्यात येईल. अशा विद्यार्थ्यांना विशेष फेऱ्यांनंतर अर्जाचा भाग एक भरणे तसेच विकल्प (अर्जाचा भाग दोन) भरण्याची सुविधा देण्यात येईल.
- विद्यार्थ्यांना कोणत्या कारणांमुळे अर्जाचा भाग दोन(Part 2) भरता येत नाही?
- विद्यार्थ्याने भरलेल्या प्रवेश अर्जातील माहितीची पडताळणी ही अपलोड केलेल्या कागदपत्रांच्या आधारे केली जाते. अर्जाची पडताळणी होण्यासाठी विलंब होणे, तसेच व्हेरीफिकेशन(Verification) अचूक न होणे याबाबी निदर्शनास आलेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग दोन वेळेत भरता येत नाही. त्यास प्रवेश नाकारला जाऊ शकतो. हे टाळणे आवश्यक आहे. याबाबत संबंधितांनी अर्ज व्हेरीफिकेशनची(Verification) कार्यवाही अचूक व वेळेत पूर्ण होईल, याची दक्षता घ्यावी.
- आरक्षित प्रवर्गातील(Reserved Category) विद्यार्थ्यांनी कोणती कागदपत्रे(Documents) सादर करावीत?
- सर्व प्रवर्गांतील विद्यार्थ्यांना जातीचा दाखला सादर करणे आवश्यक असेल. विद्यार्थ्यांचा स्वत:चा जातीचा दाखला अद्याप मिळाला नसल्यास वडिलांचा जातीचा दाखला ग्राह्य धरता येईल. ईडब्ल्यूएस प्रवर्गाचा (EWS Category) लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र(EWS Certificate) सादर करणे आवश्यक आहे. व्हीजे-एनटी(VJNT), ओबीसी(OBC), एसबीसी(SBC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जातीच्या दाखल्यासोबत(Caste Certificate) उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे 'नॉन- क्रिमीलेअर(Non Crimilayer) प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांना कोणत्याही कारणाने एनसीएल प्रमाणपत्र(NCL Certificate) मिळणारच नसेल अशा विद्यार्थ्यांनी खुल्या प्रवर्गातून(Open Category) अर्ज भरणे योग्य आहे.
Educational Updater,
0 टिप्पण्या
This website is providing you latest updates for your kind knowledge, so you can also visit the official website for detailed information,