Sppu combine passing criteria

Sppu Pune : एसपीपीयूने (SPPU) दिलेल्या माहितीनुसार, कोविडच्या पार्श्वभूमीवर विशेष बाब म्हणून 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी एकत्रित उत्तीर्ण होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) च्या विद्यापीठ प्राधिकरण मंडळाने शैक्षणिक वर्ष 2021-22 च्या उन्हाळी सत्रासाठी सर्व विद्याशाखांच्या परीक्षांसाठी "एकत्र उत्तीर्ण" (Combine passing) करण्याचा निर्णय घेतला आहे. 

विद्यापीठाने 28 जुलै रोजी एक परिपत्रक जारी करून विद्यार्थ्यांना लेखी (written) आणि तोंडी/प्रात्यक्षिक (oral / practical) अशा दोन्ही परीक्षांना बसणे बंधनकारक (Compulsory) असल्याचे नमूद केले आहे.

SPPU ने दिलेल्या माहितीनुसार, कोविडच्या पार्श्वभूमीवर विशेष बाब म्हणून एकत्रित उत्तीर्ण होण्याचा निर्णय केवळ शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी घेण्यात आला आहे. 

तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत आणि लेखी परीक्षा - या वर्षीच्या परीक्षेचे निकाल स्वतंत्रपणे न घेता एकत्रितपणे जाहीर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. (Combine passing in sppu puneu niversity) 

 मात्र, लागू असलेल्या कोणत्याही परीक्षेला विद्यार्थी गैरहजर राहिल्यास, अशा विद्यार्थ्यांना हा निर्णय लागू होणार नाही, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहे.