SPPU Pune :
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्ताने हर घर तिरंगा उपक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे स्वराज्य महोत्सव आयोजन करण्यात येणार आहे.

त्यात १५ ऑगस्ट (August) रोजी राष्ट्रध्वजाच्या साहाय्याने पुणे, नगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि नागरिक यांच्या सहभागातून ॲपच्या माध्यमातून ध्वजारोहणाचे दीड लाख सेल्फी संकलित करून जागतिक विक्रम नोंदवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी ही माहिती दिली. उपक्रमासंदर्भातील नियोजनाची बैठक नुकतीच झाली. या बैठकीला विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, डॉ. संजय चाकणे, अधिसभा सदस्य बागेश्री मंठाळकर, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. संतोष परचुरे, अधिसभा सदस्य संतोष ढोरे, हनुमंत खांदवे पाटील यांच्यासह विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते. (Sppu Latest Update)

हर घर तिरंगा(Har Tiranga)  उपक्रमात विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळातर्फे एक लाख राष्ट्रध्वजांचे वितरण पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून सहभागी झालेल्या विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या तीन हजार प्रातिनिधिक विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. 

१५ ऑगस्ट रोजी राष्ट्रध्वजाच्या साहाय्याने पुणे, नगर आणि नाशिक तिन्ही जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि नागरिक यांच्या सहभागातून ॲपच्या माध्यमातून दीड लाख ध्वजारोहणाचे सेल्फी संकलित करून जागतिक विक्रम नोंदवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. Swarajya Mahostav, Sppu university pune,