नागपूर(Nagpur):
केंद्र सरकारने जाहीर केलेले नवे शैक्षणिक(New Education Policy) धोरण 2020 (NEP)च्या अमलबजावणी बाबत स्पष्ट भूमिका शिक्षक(Teacher) व सरकारमध्येही(Government) नाही. तथापि, शतक महोत्सव साजरा करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने(RTMNU) नव्या शैक्षणिक सत्रापासून एनईपीची(NEP) अमलबजावणी करण्यासाठी कंबर कसली आहे. विद्यापीठाने अधिसूचना जारी करून एनईपी(Nep) लागू होणार असल्याचे जाहीर केले. 

नव्या वर्षांत विद्यापीठाच्या वाणिज्य(Commrce) व व्यवस्थापन(MANAGEMENT) अभ्यासक्रमाच्या बीबीएम(BBM), बीसीसीए (BCA) व बी.कॉमच्या(B.COM) पहिल्या वर्षांपासून तो लागू केला जाईल.

देशात 34 वर्षानंतर शैक्षणिक धोरणात(Education Policy) बदल होत आहे. केंद्र सरकारने(Central Government) याची अमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र धोरणाविषयी स्पष्टता नसल्याने अमलबजावणी मागे पडत होती. यास  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (RTMNU) नागपूर विद्यापीठातून सुरुवात झाली. एनईपीची(NEP) अमलबजावणी करण्याबाबतचा निर्णय विद्यापीठाने 8 जुलै रोजी झालेल्या विद्यापरिषदेच्या बैठकीत घेतला होता.

अभ्यासक्रमासह पुस्तकेही बदलणार:-

नव्या बदलासह येणाऱ्या अभ्यासक्रमात व्यावासायिकतेवर जास्त भर देण्यात येणार आहे. त्यासाठीचा अभ्यासक्रम(Syllabus) तयार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या वर्षीपासून नव्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना शिक्षण(Education) मिळणार आहे. 

यामुळे बीबीएम(BBM), बीसीसीए(BCA), व बी.कॉम(B.COM), या अभ्यासक्रमासाठी नवी पुस्तके(Books) देखील येणार आहेत. मात्र याबाबत बऱ्याच प्राध्यापकांना व शिक्षकांना माहिती नसल्याचेही समोर आले. विद्यापीठाने अचानक निर्णय घेतल्याचेही मत व्यक्त केले.

कुलपतींनी  दिली मान्यता:-

विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन(Commerce And Management) विद्याशाखेतंर्गत णाऱ्या अभ्यामंडळांनी एनईपीनुसार(NEP) बीबीएम(BBM), बीसीसीए(BCA), व बी.कॉम(B.COM) या अभ्यासक्रमाच्या सत्र 1 ते 6 च्या नवीन परीक्षा योजना तयार केल्या होत्या. यास 24 जूनच्या वाणिज्य व व्यवस्थापन(Commerce And Management) विद्याशाखेने मान्यता दिली. यानंतर विद्यापरिषदेने 8 जुलैला मान्यता(Approval) प्रदान केली आहे.

अभ्यासक्रमाच्या अभ्यासक्रमिका एनईपी नुसार तयार करण्याकरीता वाणिज्य व व्यवस्थापन(Commerce And Management) विद्याशाखेतंर्गत येणान्या अभ्यामंडळांच्या 19, 22 व 27 जुलैला झालेल्या सभेत अभ्यासमंडळांने सत्र 1 व 2 करिता अभ्यासक्रमिका एनईपी 2020 नूसार तयार केल्या व त्या लागू करण्यास समंती दिली. कुलपतींनी यास मान्यता दिली आहे.