कोरोनामुळे विद्यापीठाचे शैक्षणीक वेळापत्रक पूर्णतः कोलमडले आहे. मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या महाविद्यालयांच्या सत्र परीक्षांना जुलै-ऑगस्ट उजाडला आहे.

पुणे - जलद निकालासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने(SPPU Pume University) एकीकडे परीक्षा आणि दुसरीकडे झालेल्या विषयांची पेपर तपासणी (कॅप) सुरू केली आहे. त्यामुळे प्राध्यापकांना परीक्षेच्या पर्यवेक्षणाबरोबरच जिल्ह्यातील कॅप सेंटरवर पेपर तपासणीसाठी जावे लागत आहे. 

त्यातही काही केंद्रांवर प्राध्यापकांची पेपर तपासणीसाठी उदासीनता दिसत असून, यामुळे निकालाला(Result) उशीर होतो का काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

कोरोनामुळे विद्यापीठाचे शैक्षणीक वेळापत्रक पूर्णतः कोलमडले आहे. मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या महाविद्यालयांच्या सत्र परीक्षांना जुलै-ऑगस्ट उजाडला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेपासून ते नोकरी मिळविण्यापर्यंत विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

विद्यापीठाअंतर्गत जिल्हास्तरावर विद्या शाखेनुसार पेपर तपासणीचे केंद्र करण्यात आले आहे. द्वितीय व तृतीय वर्षाचे कॅप राउंड सुरू असून, सर्वच केंद्रांवर स्टेशनरी पोचवली जात आहे. या संदर्भात कोणतीही अडचण आलेली नाही. जलद निकालासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.


- डॉ. मनोहर चासकर, अधिष्ठाता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ


कॅप सेंटरचा आम्ही नियमित आढावा घेत आहोत. प्राध्यापकांच्या उदासीनतेबद्दल सध्या तरी कोणतीच तक्रार आलेली नाही. आम्ही पुन्हा यासंबंधीची माहिती घेऊ.


- डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ