ugc

UGC :-
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) UGC विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. अॅडमिशन(Admission) रद्द केल्यास विद्यार्थ्यांना संपूर्ण फी(Fees) परत(Return) करण्याचे आदेश यूजीसीने(UGC) महाविद्यालये आणि विद्यापीठांसह(University) सर्व उच्च शैक्षणिक संस्थांना निर्देश दिले आहेत.

पालकांच्या आर्थिक अडचणी टाळण्यासाठी यूजीसीने हा निर्णय घेतला आहे. यूजीसीच्या(UGC) माहितीनुसार, विद्यार्थ्यांनी 31 ऑक्टोबर(October) ते 31 डिसेंबर(December) 2022 या कालावधीत प्रवेश मागे घेतल्यास एका विद्यार्थ्याकडून शुल्क(Fees) म्हणून एक हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम(Amount) वजा करून घेण्यात आलेले संपूर्ण शुल्क परत केले जाईल. 

सध्या, ऑगस्ट(August) ते सप्टेंबर(September) मध्ये शैक्षणिक सत्राची सुरूवात करणाऱया खासगी विद्यापीठांच्या(Private Universities) रिफंड(Refund) पॉलिसीनुसार, वर्ग सुरू झाल्यानंतर एका महिन्याने काही कारणाने विद्यार्थ्याने अॅडमिशन(Admission) रद्द केल्यास त्यांना फी(Fees) परत दिली जात नाही. 

यूजीसीने(Ugc) 16 जुलै 2021 रोजी मार्गदर्शक सूचनांमध्ये शैक्षणिक वर्ष 2021-2022 मध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश आणि स्थलांतरामुळे(Migration) शुल्क(Fees) परताव्यासाठी धोरण(Plan) तयार केले होते.