दहावी-बारावी च्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा!

SSC-HSC Board Exams 2022 | कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे (Coronavirus in Maharashtra) राज्यात गेल्या दोन वर्षात इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांमध्ये (SSC-HSC Board Exams) विस्कळीतपणा आला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यातच यावर्षी अनेक महिने शिक्षण ऑनलाइन (Online Education) देण्यात आले. त्यामुळे एका बाजूनं ऑफलाईन विद्यार्थी (Offline Exams) विरोध करत आहेत तर राज्य सरकारनंही बोर्डाच्या (Board Exams) परीक्षा ऑफलाईनच होणार याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. परंतु आता इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता राज्य सरकारकडून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्नपेढी उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
राज्य सरकारच्या (State Government) शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार दहावी-बारावी च्या बोर्डाच्या परीक्षा (SSC-HSC Board Exams) देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य मंडळाच्या (State Board) इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव व माहिती होण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन (State Educational Research) व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (Training Council, Maharashtra) तर्फे विषयनिहाय Question Bank विकसित करण्यात आल्या आहेत. 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (School Education Minister Varsha Gaikwad) यांनी केले आहे.

Official Website To download Question Set
इथे क्लिक करा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या